भारीच! SMS ने बदलता येणार टीव्ही चॅनेल

डीटीएच धारकांसाठी मोठी खूशखबर आहे. आता अवघ्या एका SMS (एसएमएस) ने चॅनेल सुरू किंवा बंद करता येणार आहे. त्यामुळे डीटीएच धारकांना आपल्याला हवं ते चॅनेल घेणं किंवा बंद करणं सोपं होणार आहे. एसएमएसने चॅनेल घेण्याची किंवा बंद करण्याची सुविधा ग्राहकांना द्यावी, असे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेटर्सना (डीपीओ) दिले आहेत. 

चॅनेल घेण्याची आणि बंद करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती ९९९ क्रमांकावर उपलब्ध करून देण्याचे आदेश ट्रायने डीपीओंना दिले आहेत. तसंच एसएमएस सुविधा ग्राहकांना १५ दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी असेही आदेश ट्रायने दिले आहेत. ट्रायच्या या निर्णयामुळे डीटीएच धारकांना आपल्या पसंतीचं चॅनेल निवडणं सोपं जाणार आहे. तसंच त्यांना एखादे चॅनेल तात्काळ  बंदही करता येणार आहे. 

 डीटीएच धारकांनी पाठवलेल्या विनंत्याही डीपीओंना ७२ तासांच्या आत लागू कराव्या लागणार आहेत. ट्रायने तसे आदेशच दिले आहेत.  तसंच डीटीएच धारकांना ज्या कालावधीसाठी सेवा घेतली आहे, तितक्याच कालावधीसाठी शुल्क आकारलं जाणार आहे. 


हेही वाचा  -

फुकट काॅलचा खेळ खल्लास! जिओही आकारणार आता शुल्क

बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?


पुढील बातमी
इतर बातम्या