सोशल डिस्टन्सिंगची रिक्षा पाहून आनंद महिंद्रा भारावले, चालकाला दिली जॉबची ऑफर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वारंवार नागरिकांना सोशल  डिस्टन्सिंगचे आवाहन करण्यात येत आहे. एका रिक्षाचालकाने सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी अनोखी कल्पना राबवली आहे.  या रिक्षाचालकाची कल्पना सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  सोशल डिस्टन्सिंगच्या कल्पनेने उद्योगपती आनंद महिंद्रा भारावले आहेत. त्यांनी या रिक्षाचालकला चक्क आपल्या कंपनीत जाॅबची आॅफर दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या रिक्षा चालकाचे कौतुक केले आहे. या रिक्षाचालकाने सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आपल्या रिक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीने रचना केली आहे. रिक्षामध्ये बसणारे प्रवासी इतर प्रवाशांच्या संपर्कात येऊ नये अशाप्रकारची रचना त्याने केली आहे. 

आनंद महिंद्रा यांनी या रिक्षाचालकाला जॉबची ऑफर दिली आहे. त्यांनी कंपनीच्या ऑटो आणि फॉर्म सेक्टरच्या कार्यकारी संचालक राजेश यांना ट्विटमध्ये टॅग करत सांगितले की, या रिक्षाचालकाला आपल्या कंपनीत सल्लागार पदावर घ्या. रिक्षाचा हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी सांगितले की, आपल्या देशातील लोकांची काहीतरी नवीन करण्याची आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटते. राजेश, आपल्याला या रिक्षाचालकाला सल्लागार म्हणून नियुक्त केले पाहिजे.', असे त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा -

सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचं निधन

मुंबईत कोरोनानं घेतला आणखी २५ जणांचा बळी


पुढील बातमी
इतर बातम्या