'हे' बँकर घेणार अवघे १ रुपया वेतन

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत.  सर्वच क्षेत्रांचं यामध्ये मोठं नुकसान होणार आहे. परिणामी काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना विनावेतन सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर काहींनी स्वेच्छेने वेतन कपात स्वीकारली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत बँकर असलेले उदय कोटक यांनी अवघा एक रुपया वेतन घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कोटकच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने १५ टक्के वेतन कपात स्वीकारली आहे.

उद्य कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे प्रवर्तक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पीएम केअर फंडात कोटक महिंद्रा बँकेने यापूर्वीच २५ कोटींचे योगदान दिली आहे. महाराष्ट्र सरकारला १० कोटींची मदत केली आहे. उदय कोटक यानींही पीएम केअर फंडात वैयक्तिक २५ कोटी दिले आहेत. 

 लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत. अशा परिस्थिती कंत्राटी कामगारांपासून वरिष्ठ व्यवस्थापन आणि संचालकांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना विनावेतन सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. कनिष्ठ पातळीवर वेतन कपातीची मोठी झळ बसणार आहे. वरिष्ठ पातळीवर देखील वेतन कपात केली जात आहे.

उदय कोटक पुढील वर्षभर अवघे एक रुपया वेतन घेणार आहे. कोरोनाविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यावर आपण आहोत. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वित्तीय सेवा क्षेत्र सुदृढ असणे आवश्यक आहे. समाज आणि देशाच्या सुरक्षेसाठी सरकारसोबत काम करण्यास बँक कटिबद्ध आहे, असे कोटक महिंद्रा बँकेने म्हटलं आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण


पुढील बातमी
इतर बातम्या