Advertisement

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण


१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना हा संसर्गजन्य असून, राज्यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. परंतु, ज्येष्ठांपाठोपाठ आता तरुणांमध्येही कोरोनाची लागण वाढते आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारनं गुरुवारी जारी केलेल्या अहवालात स्पष्ट होत आहे. १ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण झाली असून, ११ ते २० वर्षे वयोगटामध्ये हे प्रमाण ५६ इतके नोंदवण्यात आले आहे. 

या अहवालावरून राज्यामध्ये लहान मुलांमध्येही करोना संसर्गाची लक्षणे दिसून येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. २ आठवड्यांपूर्वी यात वयोगटातील लहान मुलांना करोनाची लागण झाल्याची संख्या कमी होती. मात्र आता हा आकडा वीसच्या पुढे गेला आहे. २१ ते ३० वर्षे वयोगटातील १८२ तर ३१ ते ४० वर्षे वयोगटातील १५९ जणांना करोना झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

त्याशिवाय, ४१ ते ५० या वयोगटातील १६८ जणांना करोनाची लागण झाली आहे. २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूचे प्रमाण ०.५४ टक्के तर ३१ ते ४० वर्षे वयोगटामध्ये १.२५ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. दरम्यान, बदलत्या वातावरणामुळं मुलांना ताप, सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर घाबरून जाऊ नका. डॉक्टर सल्ला देत नाहीत तोपर्यंत स्वतःहून मुलांना करोनाच्या चाचण्यांसाठी नेऊ नका, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा