Advertisement

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण

दादरमधईल कोरोनाबाधितांचा आकडा ६ वर पोहोचला आहे.

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण
SHARES
मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही तासांच रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, दादर परिसरात कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळले आहेत. नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये सुश्रृषा हॉस्पिटलमधील २ नर्सचा समावेश आहे. या रुग्णालयातील एका २७ वर्षीय आणि दुसऱ्या ४२ वर्षीय नर्सचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर न.चि. केळकर मार्गावरील एका ८० वर्षीय वृद्धालाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं आता दादरकरांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

दादरमधील करोनाबाधितांची संख्या ६ वर पोहोचली आहे. दादरमध्ये आतापर्यंत दिनकर अपार्टमेंट, सौभाग्य अपार्टमेंट, तावडेवाडी आणि केळकर रोडवर प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून सुश्रृषा हॉस्पिटलमधील २ रुग्णांचा यात समावेश आहे. त्यामुळं आता हे रुग्णालय सील करण्यात आलं आहे.

धारावीतील करोना रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. धारावीत करोनाचे ५ नवे रुग्ण आढळले असून यातील दोघेजण दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती महापालिकेनं दिली आहे. धारावीत सापडलेल्या पाच रुग्णांपैकी वोकहार्डमधील डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे. त्या वैभव अपार्टमेंटमध्ये राहत असून हा परिसर तात्काळ सील करण्यात आला आहे. दुसरा रुग्ण हा मुस्लिम नगरमधील आहे. कल्याणवाडी येथेही ३१ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असून मुरगन चाळ आणि पीएमजीपी कॉलनीतही प्रत्येकी एक पुरुष रुग्ण सापडला आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या २२वर गेली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा