BSNL आणि MTNL चं होणार विलीनीकरण

आर्थिक अडचणीत असलेल्या BSNL आणि MTNL या सरकारी दूरसंचार कंपन्यांचं आता विलीनीकरण होणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. 

विलीनीकरणच्या निर्णयामुळे या कंपन्या बंद होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी केली जाणार नाही. तसंच तिसऱ्या कोणत्याही कंपनीला यामध्ये सामावून घेतलं जाणार नाही, असं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केलं. विलीनीकरणानंतर MTNL ही BSNL ची सहाय्यक कंपनी म्हणून काम करणार आहे. 

दोन्ही कंपन्यांमधील मनुष्यबळ कमी करण्यासाठी स्वेच्छा निवृत्तीचे आकर्षक पॅकेजही जाहीर करण्यात आल्याची घोषणा रविशंकर प्रसाद केली. व्हीआरएस योजनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचं वय ५३ वर्ष असेल तर त्याला वयाच्या साठीपर्यंत १२५ टक्के पगार मिळणार आहे.  ४जी स्पेक्ट्रमसाठी ४ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून १५ हजार कोटींचे बाँड जारी करण्यात येणार आहे, असंही रविशंकर यांनी सांगितलं. 


हेही वाचा -

बँकांमध्ये होणार ५ दिवसांचा आठवडा

मोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँका आकारतात 'हे' शुल्क


पुढील बातमी
इतर बातम्या