Advertisement

बँकांमध्ये होणार ५ दिवसांचा आठवडा

बँक कर्मचाऱ्यांसाठी आता मोठी खूशखबर आहे. बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील ५ दिवसच काम करावं लागणार आहे.

बँकांमध्ये होणार ५ दिवसांचा आठवडा
SHARES

बँक कर्मचाऱ्यांसाठी आता मोठी खूशखबर आहे. बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील ५ दिवसच काम करावं लागणार आहे. कारण लवकरच बँकांमध्ये ५ दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँका सोमवार ते शुक्रवार चालू असतील. सध्या दर रविवारी आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. 

५ दिवसांच्या आठवड्यासह बँक कर्मचाऱ्यांना आणखीही खुशखबर मिळणार आहे.  बँक कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनमध्ये आणि पगारात १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाने बँक कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचं मान्य केलं आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून त्यांचे प्रश्न महिनाभरात मार्गी लावावेवत असे आदेश अर्थ मंत्रालयाने इंडियन बँक्स असोसिएशनला (आयबीए) दिले आहेत. त्यानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बँक संघटनांसमवेत आयबीएची बैठक होणार आहे. यावेळी पाच दिवसांचा आठवडा, फॅमिली पेन्शन, वेतनवाढ आदींबाबत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

 बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या २०१७ पासून प्रलंबित आहेत. ५ दिवसांचा आठवडा करावा आणि पगारात २५ टक्क्यांची वाढ करावी या बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. २५ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता नसल्याने १५ टक्के पगारवाढीवर सहमती होण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा  -

मोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँका आकारतात 'हे' शुल्क

पीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा