कार्लाइल ग्रुप रिलायन्स रिटेलमध्ये करणार १५ हजार कोटींची गुंतवणूक

अमेरिकेतील प्रायवेट इक्विटी फर्म सिल्वर लेकने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा मागील आठवड्यात केली आहे. त्यापाठोपाठ आता कार्लाइल ग्रुप रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये) १५ हजार कोटी रुपयांची (२ अब्ज डॉलर) गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. 

कार्लाइल ग्रुपची रिटेल क्षेत्रातील ही पहिलीच गुंतवणूक आहे. भारतीय रिटेल क्षेत्रात १५ हजार कोटींची गुंतवणूक या क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरू शकते. अमेरिकन कंपनी भारतात ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या योजनेवर काम करत आहे. यात रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमधील गुंतवणुकीचाही समावेश आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये या गुंतवणुकीबाबत चर्चा सुरू आहेत.

सिल्वर लेकने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमधील १.७५ टक्के भागीदारी खरेदी केली आहे. यापूर्वी सिल्वर लेकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २.०८ टक्के भागीदारी खरेदी केली होती.  मुकेश अंबानी भारतात रिटेल व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. मुकेश अंबानी या विस्तारासाठी संभाव्य गुंतवणूकदार शोधत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड फ्यूचर समूहाचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय तसेच, लॉजिस्टीक्स अँड वेअरहाउसिंग व्यवसाय घेणार आहे. यातून रिलायंस, फ्यूचर ग्रुपचा बिग बाजार, ईजीडे आणि एफबीबीचे १८०० पेक्षा जास्त स्टोर्सपर्यंत पोहचेल. हा करार २४७१३ कोटी रुपयांचा आहे.


हेही वाचा -

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक करणार ७५०० कोटींची गुंतवणूक

Vodafone-Idea ला मिळालं नवं नाव, पण ग्राहकांना भुर्दंड


पुढील बातमी
इतर बातम्या