गॅस सिलिंडरवरील सबसिडी रद्द

घरगुती गॅस सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी केंद्र सरकारने रद्द केली आहे. कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किंमती खुल्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीच्या पातळीवर आल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने मे महिन्यापासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. हा बदल करतानाच सरकारने सबसिडी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे मे, जून आणि जुलै मध्य गॅस सिलेंडर घेतल्यानंतर ग्राहकांना सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले नाहीत. अनुदानित गॅस सिलिंडरवरील सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी करून ती बंद करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं.

एका वर्षापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या सबसिडीत सरकारने कपात केली होती. त्यानंतर मागील ४ महिन्यांपासून ही सबसिडी बंद केली आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ५९४ इतकी झाली आहे. या दोन्ही गॅस सिलिंडरच्या दरात आता फारशी तफावत राहिलेली नाही. त्यामुळे गॅस सबसिडीची आता गरज नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळे गॅस सबसिडी आता रद्द केली आहे.


हेही वाचा -

पंजाब नॅशनल बँकेचं गृह, वाहन कर्ज महागलं

मुंबई विमानतळ अदानी समूहाकडं, करार प्रक्रिया पूर्ण


पुढील बातमी
इतर बातम्या