Advertisement

मुंबई विमानतळ अदानी समूहाकडं, करार प्रक्रिया पूर्ण

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ७४ टक्के हिस्सेदारीं अदानी उद्योग समूहाने खरेदी केली आहे. याबाबतची करार प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मुंबई विमानतळ अदानी समूहाकडं, करार प्रक्रिया पूर्ण
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ७४ टक्के हिस्सेदारीं अदानी उद्योग समूहाने खरेदी केली आहे. याबाबतची करार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा विमानतळ आता अदानी समूहाच्या ताब्यात आला आहे.

मुंबई विमानतळमधील जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंगची हिस्सेदारी खरेदी करण्याचा करार झाला असल्याचा माहिती उद्योगपती गौतम अदाणी यांनी दिली आहे. जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंगकडे ५०.५ टक्के भागभांडवल होते. सध्या बिडवेस्ट या दक्षिण आफ्रिकन कंपनीकडे १३.५ टक्के तर दक्षिण आफ्रिकेच्याच एसीएसए या कंपनीकडे १० टक्के भागभांडवल आहे.

मुंबई विमानतळातील हिस्सा खरेदी केल्यानंतर देशातील ६ विमानतळे अदानी समुहाकडे असणार आहे. सध्या दिल्ली, हैदराबाद अशा विमानतळांच्या देखरेखीचे आणि हाताळणीचे काम करणारे जीएमआर समुह देशातील मोठे ‘प्रायव्हेट एअरपोर्ट ऑपरेटर’ आहे.अदानी समूहाला जयपूर, गुवाहटी, तिरुवनंतपूरम एअरपोर्ट ५० वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. पीपीपी मॉडेलनुसार अदानी समूहाला देशातील सहा विमानतळाचे संचालन, देखरेख आणि विकासाचा अधिकार मिळाला आहे. यात अहमदाबाद, लखनऊ, मंगलोर, जयपूर, तिरुवनंतपूरम आणि गुवाहटी यांचा समावेश आहे.



हेही वाचा -

२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद

आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गृहकर्ज, बँकांचे 'असे' आहेत व्याजदर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा