Advertisement

मुंबई विमानतळ अदानी समूहाकडं? ७४ टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता आहे. अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमधील ७४ टक्के वाटा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे.

मुंबई विमानतळ अदानी समूहाकडं? ७४ टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता आहे.  अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमधील ७४ टक्के वाटा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे.  मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीकडं सध्या मुंबई विमानतळाचा कारभार आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अदानी कंपनी खासगी क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा एअरपोर्ट ऑपरेटर ठरेल.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटे मध्ये जीव्हीके समूहाचा सर्वाधिक हिस्सा आहे. जीव्हीके समूहाकडील ५०.५ टक्के हिस्सा अदानी समूहाने खरेदी केला. आता अन्य हिस्सेरादांपैकी दक्षिण आफ्रिकेतील कंपनी ACSA आणि बिडवेस्ट ग्रुप यांच्याकडील अनुक्रमे १० आणि १३.५ टक्के हिस्सा अदानी समूह विकत घेणार आहे. हा हिस्सा खरेदी केल्यानंतर अदानी समूहाकडे ७४ टक्क्यांची मालकी येईल. अदानी समूह हिस्सा विकत घेण्यासाठी १५ हजार कोटी रुपये मोजू शकते.

अदानी समूहाला जयपूर, गुवाहटी, तिरुवनंतपूरम एअरपोर्ट ५० वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. पीपीपी मॉडेलनुसार अदानी समूहाला देशातील सहा विमानतळाचे संचालन, देखरेख आणि विकासाचा अधिकार मिळाला आहे. यात अहमदाबाद, लखनऊ, मंगलोर, जयपूर, तिरुवनंतपूरम आणि गुवाहटी यांचा समावेश आहे.



हेही वाचा  -

आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गृहकर्ज, बँकांचे 'असे' आहेत व्याजदर

४ सरकारी बँकांचं होणार खासगीकरण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा