Advertisement

२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद

२०१९-२० च्या रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद
SHARES

२०१९-२० या आर्थिक वर्षात २ हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या गेल्या नाहीत. २०१९-२० या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेनं २००० रुपयांची एकही नोट छापली नाही. यासह २००० हजारांच्या नोटांचा प्रसार देखील कमी झाला आहे. २०१९-२० च्या रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

आरबीआयनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मार्च २०१८ मध्ये व्यवहारात असलेल्या २००० च्या नोटांची संख्या ३३ लाख ६३२ होती. जी मार्च २०१९ अखेर ३२ लाख ९१० वर आली. यासह मार्च २०२० च्या अखेरीस २००० हजारांच्या नोटांची संख्या अधिक घटली. आता हा आकडा २७ हजार ३९८ वर आल्या आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत १० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत १४४.६ टक्के, ५० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत २८.७ टक्के, २०० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत १५१.२ टक्के आणि ५०० रुपयांच्या (नवीन नोट्स) संख्येच्या ३७.५ टक्के वाढली आहे.

२०, १०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या अनुक्रमे ३७.७ टक्के, २३.७ टक्के, २२.०१ टक्के इतकी घसरण झाली आहे.



हेही वाचा

आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गृहकर्ज, बँकांचे 'असे' आहेत व्याजदर

४ सरकारी बँकांचं होणार खासगीकरण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा