बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट शिथिल

पुढील तीन महिन्यांसाठी बँकांतील बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट शिथिल केल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. बचत खात्यात किमान शिल्लक नाही म्हणून जून २०२० पर्यंत बँकांना खातेदारांकडून कोणताही दंड वसुल करता येणार नाही, यामुळे बँक खातेदारांना दिलासा मिळाला.

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. दळणवळणाची साधनेही बंद ठेवण्यात आली आहेत. आधीच मंदीच्या स्थितीतून देश जात आहे. त्यातच कोरोना विषाणूमुळे नवे आव्हान उभे राहिले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काही घोषणा केल्या.

आपल्या बँकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून डेबिट कार्डच्या साह्याने पैसे काढल्यास कोणतेही शुल्क तीन महिन्यांसाठी आकारले जाणार नाही. त्याचबरोबर महिन्यातून चारपेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यासही कोणताही दंड आकारला जाणार नाही. येत्या एप्रिल अखेरपर्यंत काय परिस्थिती राहते हे पाहून सरकार पुढील निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा -

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 115 वर

Coronavirus Updates : जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्या - भाकप


पुढील बातमी
इतर बातम्या