करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं राज्य सरकारनं संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तू, तसंच भाजीपाला पुरवठा सुरू राहणार आहे. मात्र, तरिही नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लोक खरेदीसाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत. त्यामुळं ही गर्दी टाळण्यासाठी सरकारनं जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्याव्यात, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी असूनही अनेक नागरिक बाजारपेठांमध्ये किराणा, भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. किराणा मालाच्या दुकानांमध्ये आणि भाजीपाला बाजारात लोकांची गर्दी होत आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येनं वाहनं देखील उभी केली जात असल्यानं वाहतूक कोंडी होत आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जात नाही, असं भाकपनं पत्रकात नमूद केलं आहे. बाजारपेठांमध्ये अन्नधान्य आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवणं पोलीस यंत्रणेला कठीण जात आहे. त्यामुळं ही गर्दी टाळण्यासाठी सरकारनं किराणा दुकान आणि भाजीपाला बाजाराच्या वेळा निश्चित कराव्यात.
अन्नधान्याचा आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची शाश्वती नागरिकांना द्यावी. प्रत्येकाला ठराविक किलोच भाजीपाला आणि अन्नधान्य देण्यासंदर्भातील नियम करावा, अशी मागणी भाकपतर्फे करण्यात आल्याचं समजतं.
हेही वाचा -
Coronavirus Updates : गुढीपाडव्याला प्रथमच शुकशुकाट
Coronavirus Updates : अत्यावश्यक वाहतुकीसाठी राज्य सरकारचा 'हा' निर्णय