Advertisement

Coronavirus Updates : गुढीपाडव्याला प्रथमच शुकशुकाट


Coronavirus Updates : गुढीपाडव्याला प्रथमच शुकशुकाट
SHARES

दरवर्षी मुंबईसह राज्यभरात थाटात गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. तसंच, हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात येते. परंतु, यंदा कोरोना व्हायरसच्या भीतीमुळं नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलं आहे. त्यामुळं यंदा प्रथमच गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं गर्दी करू नका असं आवाहन राज्य सरकारनं केलं. त्यामुळं नागरिकानी गर्दी टाळण्यासाठी यंदा शोभायात्रा रद्द केल्याचं समजतं.

मुंबईतील गिरगावातील शोभायात्रेचं एक वेगळचं वैशिष्ट्यं आहे. गुढीपाडवा व नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेसाठी अनेक गिरगांवरकरांसह मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोक गर्दी करतात. मुंबईकर पारंपारिक पोषाक घालतात. तसंच, चलचित्रांचा देखावा व ढोल-ताशांच्या गजरात गिरगावांत यात्रा काढली जाते. 

गुढीपाडव्यानिमित्त चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली, ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरुणाई हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रा काढली जाते. रस्त्यावर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. मात्र यंदा सर्वत्र शुकशुकाट आहे. त्याच कारण म्हणजे राज्यासह देशावर आलेलं कोरोना व्हायरसचं संकट. या कोरोनामुळं देशातील नागरिक हैराण झाले आहेत. 

यंदा गुढीपाडव्याला नारिकांनी कोरोनाच्या भीतीमुळं घराबाहेर न पडणं पसंत केलं आहे. खबरदारी घेतली जात असून, प्रत्येक स्थितीचा सामना करत आहेत. 



हेही वाचा -

आज रात्री १२ वाजल्यापासून देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

Coronavirus Updates : अत्यावश्यक वाहतुकीसाठी राज्य सरकारचा 'हा' निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा