Advertisement

Coronavirus Updates : अत्यावश्यक वाहतुकीसाठी राज्य सरकारचा 'हा' निर्णय

अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना स्टीकर लावून वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे.

Coronavirus Updates : अत्यावश्यक वाहतुकीसाठी राज्य सरकारचा 'हा' निर्णय
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीदरम्यान केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांव्यतिरीक्त अनेक जण घराबाहेर पडत असून खाजगी वाहनांनी प्रवास करत आहेत. मात्र, आता राज्यात केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना स्टीकर लावून वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मालवाहतूक ट्रक, टेम्पोचालकांना अखेर दिलासा मिळाला आहे. मालवाहतूकदारांनी वाहतूक करणाऱ्या कामगारांना ओळखपत्रे देण्याचे आदेशही मंगळवारी परिवहन विभागानं दिले आहेत. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) हे स्टिकर उपलब्ध आहेत. ते वाहनांच्या समोरील भागावर चिकटवणे गरजेचे आहे. 

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करत असल्याचा पुरावा दिल्यानंतर आरटीओमधून एका वाहनांसाठी एक असं स्टिकर देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मालवाहतूकदारांनी चालकांना आणि कामगारांना ओळखपत्र पुरवावे तसंच, संघटनेच्या लेटरहेडवरील यादीत अशा व्यक्तींची नावं नमूद करावीत. 

ज्या गोदामांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात आला आहे, अशा गोदामांपर्यंतची किंवा गोदामातून बाहेर जाणारी वाहतूकही अत्यावश्यक समजण्यात येईल. अशा वाहनांची माहितीही आरटीओमध्ये द्यावी आणि स्टिकर घ्यावे, अशा सूचनाही परब यांनी केल्या आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर अनेक शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होत आहे. या वस्तूंचा पुरवठा अविरत सुरू रहावा यासाठी परिवहन आयुक्तालयात मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह ट्रक, टेम्पोमालक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या चालकांसह, ओझी उतरवणाऱ्या कामगारांच्या घरापासून मालवाहनांपर्यंत, तसेच काम पूर्ण झाल्यावर वाहनांपासून पुन्हा घरापर्यंत जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचाही समावेश 'अत्यावश्यक' वाहतुकीत करण्यात येईल. अशा वाहनांची माहिती आरटीओमध्ये देत या वाहनांनाही स्टिकर लावणे बंधनकारक असल्याचे परिवहन आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले.



हेही वाचा -

Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद

होम क्वारंटाइन असतानाही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा