Advertisement

Coronavirus Updates : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२५ वर

वाढ झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील ५ तर ठाण्यातील एकाचा समावेश आहे.

Coronavirus Updates : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२५ वर
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा आता १२५ वर गेला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. वाढ झालेल्या रुग्णांमध्ये सांगलीतल्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. त्यामुळे सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे. तर संध्याकाळी आणखी ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ जण मुंबईतील तर १ जण ठाण्यातील आहे.   

Maharashtra break up 125(122 active cases and 3 deaths)

  • Pimpri : 12
  • Pune : 19
  • Mumbai : 53 
  • Nagpur : 4
  • Yamtval : 4
  • Kalyan : 5
  • Navi Mumbai : 4
  • A'nagar : 3
  • Panvel : 1
  • Thane :3
  • Ulhasnagar : 1
  • Aurangabad : 1
  • Ratnagiri : 1 
  • Satara 2
  • Islampur sangali 9

इस्लामपूर येथे दोन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्याचं सोमवारी उशिरा स्पष्ट झालं होतं. हे चारही जण हजहून आले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले होते. तसेच बसस्थानकावरून शहरात येणारा मुख्य रस्ता, गांधी चौक परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यानंतर प्रशासानाने त्यांच्या कुटुंबाशी निगडीत ३९ लोकांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन केले होते. प्रशासनाने २५० लोकांना होम क्वारंटाइन केले होते.

निगराणीखाली असलेल्या या ३९ जणांपैकी ५ जणांचे रिपोर्ट आले असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हे पाचही जण एकाच कुटुंबातील आहे. हे लोक आणखी किती लोकांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहे



हेही वाचा -

Coronavirus Updates : जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्या - भाकप

Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा