आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर

अ‍ॅमेझॉनवरून ग्राहक नेहमीच वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करत असतात. मात्र आता ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवर सिलेंडर बुक करता येणार आहे. यासाठी अ‍ॅमेझॉन इंडियाने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार केला आहे. त्यानुसार आता एचपी कंपनीचा सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवरुन पैसे भरुन सिलेंडर घेता येणार आहे. 

ग्राहकांना त्यामुळे IVR च्या माध्यमातून सिलेंडर बुक करण्याची आवश्यकता नाही. सिलेंडर बुक करायचा असल्यास थेट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे टॅबवर जाऊन बुकिंग करावं लागेल. त्यानंतर कोणत्याही डिजिटल मोडचा वापर करून पैसे देता येतील. 

 याशिवाय, अ‍ॅलेक्सा आणि फायर टीव्ही स्टिक या तंत्रज्ञानाच्या मदतीनेही ग्राहकांना सिलेंडर बुक करता येणार आहे. मात्र, एचपी  गॅस कंपनीच्या ग्राहकांनाच ही सुविधा देण्यात आली असून त्यांनाच अ‍ॅमेझॉनवरून सिलेंडर बुक करता येणार आहे.

असा करा सिलेंडर बुक

१) सिलेंडर बुक करण्यासाठी सर्वप्रथम अ‍ॅमेझॉन पे टॅबवर जा.

२) LPG कॅटेगरीवर क्लिक करावे.

३) तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा एचपी गॅसचा १७ अंकी नंबर टाकावा लागेल.

४) ग्राहकाच्या मोबाईलवर कन्फर्म करण्यासाठी एक मेसेज येईल. तो कन्फर्म करताच तुमचा सिलेंडर बुक होईल.

५) अ‍ॅमेझॉन पेमेंटच्या साहाय्याने पैसे भरल्यास ग्राहकांना ५० रुपयांचा कॅशबॅकही मिळेल.


हेही वाचा -

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह  Diwali 2020

दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई 


पुढील बातमी
इतर बातम्या