Advertisement

Diwali 2020: दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई

यंदा दिवाळीत खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी अव्वाच्या-सव्वा भाडे आकारल्यास त्यांना महागात पडणार आहे.

Diwali 2020: दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई
SHARES

दरवर्षी दिवाळीनिमित्त (diwali) खासगी बस वाहतुकीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लूटमार होते. परंतु, यंदा दिवाळीत खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी अव्वाच्या-सव्वा भाडे आकारल्यास त्यांना महागात पडणार आहे. अवाजवी भाडे आकारणी करणाऱ्या चालक-मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे.

याबाबतचे आदेशच राज्यातील सर्व आरटीओंना (rto) देण्यात आले आहेत. तसंच, याप्रकरणी जास्तीत जास्त ४ हजार रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. एसटी महामंडळानं (msrtc) त्या-त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे भाडेदर निश्चित केलेले आहे. खासगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी प्रति किलोमीटर भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनानं निश्चित केलेलं आहे.

दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात प्रवासी गावी परत येत व जात असतात. त्यादरम्यान खासगी प्रवासी बसद्वारे (private buses) प्रवासी वाहतूक करताना वाहतुकदार मोठ्या प्रमाणात अवाजवी भाडे आकारणी करत असल्याबाबातच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे येत होत्या.

या पार्श्वभूमीवर आरटीओच्या पथकाद्वारे खासगी प्रवासी बसवर कारवाई करावी आणि ज्या ठिकाणाहून प्रवासी बसेस सुरु होतात त्या ठिकाणी जास्त दराने भाडे आकारणी होत आहे का  याची खात्री करण्याच्या सूचना परिवहनकडून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रोर करण्याचे आवाहनही केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा