Advertisement

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह

महाराष्ट्र सरकारने राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५ नोव्हेंबर पासून ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्यात परवानगी दिली आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह
SHARES

महाराष्ट्र सरकारने राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५ नोव्हेंबर पासून ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्यात परवानगी दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने घेतलेला हा हा महत्वाचा निर्णय आहे. सोबतच जलतरण तलाव उघडण्यास देखील संमती देण्यात आलेली आहे. (Cinema halls in Maharashtra to reopen with 50% capacity from Nov 5)

कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेली सगळी सिनेमागृहं आणि नाट्यगृहांना ही संमती देण्यात आली आहे. मागील ७ महिन्यांपासून राज्यभरातील सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद होती. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य सरकारने अनेक सेवा-सुविधांना अटी शर्थींच्या आधारे परवानगी दिली आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सिनेमा, मालिकांच्या चित्रीकरणास देखील सुरूवात झाली आहे. 

केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यामध्येच सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती पाहता राज्य सरकारने हा निर्णय प्रलंबितच ठेवला होता. त्यातच दिवाळी असल्याने सिनेमागृह, नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी देखील या क्षेत्रातील संघटनांकडून सरकारकडे वारंवार करण्यात येत होती. त्यावर सिनेमागृहांबाबतची एसओपी निश्चित झाल्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं होतं.

त्यानुसार देण्यात आलेली ही परवानगी सिने क्षेत्रासाठी आश्वासक ठरेल. त्याचसोबत  कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलाव उघडण्यासही राज्य सरकारकडून संमती देण्यात आली आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत देखील काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. 

कोरोना संदर्भातील सर्व नियमांचं पालन करणे, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग करणे या अटी पाळण्याच्या  सूचना सरकारने केल्या आहेत. जलतरण तलावांसोबतच योगा इन्स्टिट्यूट, इनडोअर गेम्स या सेवांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. या सेवांना देखील कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळणं बंधनकारण असणार आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा