पीएफसाठी आता व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन सेवा

पीएफचे व्यवस्थापन पाहणाऱ्या भविष्यनिधी संघटना (ईपीएफओ) ने आता व्हॉट्सअ‍ॅपची सेवा सुरू केली आहे. ईपीएफओ सदस्यांच्या तक्रारींचे वेगाने निवारण होण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा देण्यात आली आहे. 

ईपीएफओकडे तक्रार निवारणासाठी सध्या संकेतस्थळ, फेसबुक, ट्विटर आणि कॉल सेंटरची सेवा आहे. आता यांच्या बरोबरीने व्हॉट्सअ‍ॅप हे अतिरिक्त साधन उपलब्ध असेल, असं केंद्रीय कामगार मंत्रालयानं म्हटलं आहे. ईपीएफओच्या देशभरातील सर्व १३८ क्षेत्रीय कार्यालयांकडून ही व्हॉट्सअ‍ॅप सेवा कार्यान्वित केली गेली आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे हेल्पलाइन क्रमांक हेच त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक असणार आहेत. . ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावरही त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देण्यात आले आहेत.

 केंद्रीय कामगार मंत्रालयाने म्हटलं की, कोरोनाच्या काळात कोणत्याही व्यत्ययाशिवाय ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता ईपीएफओच्या सर्व १३८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. कोणताही सदस्य त्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हेल्पलाइन नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवरून ईपीएफओशी संबंधित सेवांबद्दल तक्रार करू शकतो.

पुढील बातमी
इतर बातम्या