मायकेल पात्रा RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर

रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा यांची नियुक्ती करण्यात आली असून ते विरल आचार्य यांची जागा घेतील. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून येत्या २३ जुलै रोजी निवृत्त होतील. त्यानंतर पात्रा पुढील ३ वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदी राहतील. पात्रा सध्या पतधोरण समितीचे सदस्य आहेत.

पात्रा विकासाला चालना देण्यासाठी पतधोरणात व्याजदर कपातीचे समर्थक आहेत. पात्रा यांनी आयआयटी मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. आंतररराष्ट्रीय पातळीवरील अर्थ, पैसा आणि धोरणे याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरणे विभागाचे ते सल्लागार होते. त्यांनी हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर संशोधनात्मक लिखाण केलं आहे.

१९८५ मध्ये ते रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. २००५ पासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करत आहेत. रिझर्व्ह बँकेत विविध विभागात तब्बल ३५ वर्षे काम करण्याचा मायकेल पात्रा यांना अनुभव आहे.


हेही वाचा- 

टाटा-वाडियांमध्ये समेट, ३००० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला मागे

करबचतीसाठी पोस्ट आॅफिसच्या 'ह्या' ५ योजना


पुढील बातमी
इतर बातम्या