HDFC कडून ठेवींवरील व्याजदरात 'इतकी' कपात

एचडीएफसी बँकेने आपल्या ठेवींवर (फिक्स्ड डिपॉझिट) व्याजदरात मोठी कपात करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.  बँकेने १ वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ०.१५ टक्के कमी केला आहे. या मुदत ठेवींवर आता ६.३० टक्के व्याज मिळणार आहे. तर एचडीएफसीने १ ते २ वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरही ०.१५ टक्क्याने घटवला आहे. नवीन दर १६ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

एचडीएफसी बँकेकडून आता ७ ते १४ दिवसांच्या मुदत ठेवीवर ३.५० टक्के तर १५-२९ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४ टक्के, ३०-४५ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४.९० टक्के, ४६ दिवस ते ६ महिन्यांच्या मुदत ठेवीवर ५.४० टक्के व्याज देण्यात येणार आहे. ६ महिने ते ९ महिन्यांच्या आणि ९ महिने ते १ वर्षांच्या मुदत ठेवींवर एचडीएफसीकडून अनुक्रमे ५.८० टक्के आणि ६.०५ टक्के व्याज मिळणार आहे.

 २ ते ५ वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरातही बँकेने ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. या ठेवींवर आता ६.४० टक्के व्याज मिळेल. तर ३ वर्षे दिवस ते ५ वर्षे कालावधी असलेल्या ठेवींवर ६.३० टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य ग्राहकांच्या तुलनेत ०.५० टक्के अधिक व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या  मुदत ठेवींवर ४ टक्के ते ६.९० टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.


हेही वाचा -

INCOME TAX लवकरच क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेटने भरता येणार

SIP तून घ्या शेअर बाजाराचा फायदा


पुढील बातमी
इतर बातम्या