INCOME TAX लवकरच क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेटने भरता येणार

सध्या नेट बँकिंग व डेबिट कार्डद्वारे प्राप्तिकर भरला जातो. किंवा तुम्हाला बँकेत जाऊन रोख रक्कम भरावी लागते. सध्या केवळ ६ बँकांच्या नेट बँकिंग आणि डेबिट कार्डद्वारेच प्राप्तिकर भरला जाऊ शकतो.

SHARE

केंद्र सरकार लवकरच वैयक्तिक करदात्यांना मोठा दिलासा देणार आहे. येत्या काही दिवसांत क्रेडिट कार्ड, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि मोबाइल वॉलेटद्वारे करदात्यांना आपला प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) भरता येणार आहे. 

लवकरच प्राप्तिकर भरण्याची सुविधा यूपीआयमार्फत दिली जाईल, असं महसूल सचिव अजय भूषण यांनी म्हटलं आहे. यावर काम चालू असून  लवकरच याबाबत परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे, असंही भूषण यांनी म्हटलं. तर कर भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अधिक पर्याय देण्याचा आम्ही विचार करत आहोत. करदात्यांना लहान पेमेंट करण्यासाठी मोबाइल वॉलेट्स अधिक सोयीस्कर आहेत. आम्ही इलेक्ट्रॉनिक पेमेंटची नव्याने व्याख्या करणार आहोत ज्यात मोबाइल वॉलेट, क्रेडिट कार्ड आणि यूपीआय देखील असतील, असं दुसऱ्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.  

सध्या नेट बँकिंग व डेबिट कार्डद्वारे प्राप्तिकर भरला जातो.  किंवा तुम्हाला बँकेत जाऊन रोख रक्कम भरावी लागते. सध्या केवळ ६ बँकांच्या नेट बँकिंग आणि डेबिट कार्डद्वारेच प्राप्तिकर भरला जाऊ शकतो. या बँकांमध्ये कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांचा समावेश आहे.हेही वाचा -

SIP तून घ्या शेअर बाजाराचा फायदा

PF खात्यातील शिल्लक रकमेची माहिती हवीय? 'हे' आहेत ४ मार्ग
संबंधित विषय
ताज्या बातम्या