Advertisement

SIP तून घ्या शेअर बाजाराचा फायदा

कमी जोखीम असलेल्या शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग SIP मानला जातो.

SIP तून घ्या शेअर बाजाराचा फायदा
SHARES

चांगल्या परताव्यासाठी शेअर बाजार हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जात आहे. मात्र, शेअर बाजारात जोखीमही जास्त आहे. गुंतवणुकीच्या चुकीच्या निर्णयामुळे शेअर बाजारात मोठा तोटा होण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कमी जोखीम असलेल्या शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी-SIP) मानला जातो. या योजनेत दरमहा विशिष्ट रकमेची गुंतवणूक केली जाते. कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या फंडात अवघ्या ५००  रुपयाने दरमहा एसआयपी सुरू करता येते.

एसआयपी कशी सुरू करावी

म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक योजनेत एसआयपीमार्फत गुंतवणूक करणे सुलभ होते. गुंतवणूकीची ही पद्धत बँक आणि पोस्ट ऑफिसच्या आरडीसारखी आहे. म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्या सर्व योजनांमध्ये एसआयपीमार्फत गुंतवणूकीची सुविधा पुरवतात. एसआयपी ऑफलाइन आणि ऑनलाइन उपलब्ध आहेत. ऑफलाइन म्हणजे आपण एजंटद्वारे एसआयपी सुरू करू शकतो. एसआयपीमध्ये दर महिन्याला तुम्ही ठरवलेली रक्कम तुमच्या खात्यातून कट होऊन म्युच्युअल फंडात जमा होते


एसआयपीचे फायदे

बँकेतून पैसे वजा

एसआयपीमध्ये दरमहा पैसे थेट बँक खात्यातून वजा केले जातात. दर महिन्याला कोणतीही तारीख एसआयपीसाठी  निवडण्याची संधी असते.

कधीही पैसे काढू शकता

गुंतवणूकदार कधीही एसआयपीची रक्कम कमी करू शकतात किंवा वाढवू शकतात. जर गुंतवणूकदाराला पैशांची गरज असेल तर तो त्या दरम्यान काही पैसे काढू शकतो. असे केल्याने एसआयपीवर परिणाम होत नाही. एसआय़पी सुरूच राहते.  

दंड नाही

एसआयपी कितीही दिवस, महिने आणि वर्ष सुरू ठेवू शकतो. गुंतवणूकदाराला कधीही एसआय़पी बंद करता येते. एसआयपी बंद करताना कोणताही दंड आकारला जात नाही

गुंतवणूक मर्यादा नाही

एसआयपीमध्ये कमाल गुंतवणूक रकमेची मर्यादा नाही. कमीत कमी ५०० रुपयाने एसआयपी सुरू करता येते.  जास्तीत जास्त कितीही रक्कम यामध्ये गुंतवणूकदाराला गुंतवता येते

रोज मूल्य कळते

गुंतवणूकदाराला एसआयपीचे स्टेटमेंट कधीही मिळू शकते. तर गुंतवणूकदाराला दररोज त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य कळते. सर्व म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्या प्रत्येक योजनेचे नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) दररोज घोषित करतात.

लाभांश पर्याय 

म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकदार लाभांश निवडू शकतात आणि जेव्हा कंपन्या लाभांश देतात तेव्हा गुंतवणूकदाराला पैसे थेट बँक खात्यात मिळतात.



हेही वाचा -

डेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card

COUPLES साठी पैशांचं व्यवस्थापन करणारी अॅप्स




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा