Advertisement

15 हजार पोलिस भरती करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला.

15 हजार पोलिस भरती करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
SHARES

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र (maharashtra) पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिसांची भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वातील गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय?

1. गृह विभाग - महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिस भरती करण्यास मंजुरी देणयाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

2. अन्न, नागरी पुरवठा विभाग - राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय झाला आहे.

3. विमानचालन विभाग - सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

4. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित महामंडळांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच बेकायदा बांधकामांमुळे चर्चेत असलेल्या ठाणे महापालिका (thane municipal corporation) क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावरील दंड माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय काढला.



हेही वाचा

पालिकेच्या मालमत्ता चित्रपट-ओटीटी शूटिंगसाठी वापरल्या जाणार

वसई विरार शहरातील महापालिका परिवहन सेवा ठप्प

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा