Advertisement

डेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card

सध्याच्या डिजिटल जगात डेटा सुरक्षित ठेवणं कठीण होत आहे. डेटा चोरीमागे आपलं बँक खातं साफ करणं हा गुन्हेगारांचा एकच हेतू आहे. काही गोष्टींची काळजी घेऊन आपल्या बँक डेटाचे संरक्षण करू शकतो. कार्डधारकाने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती आपण घेऊया.

डेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card
SHARES

डेटा चोरी ही एक मोठी समस्या बनत आहे. ही डेटा चोरी जर बँकिंगशी संबंधित असेल तर याचा फटका खूप लोकांना बसतो. आईबीए ग्रुपच्या सायबर सुरक्षा संशोधकांनी या वर्षी बँकिंग क्षेत्राशी संबंधित सर्वात मोठी सायबर चोरी उघडकीस आणली आहे. १३ लाख भारतीयांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा ऑनलाईन विकला जात असल्याची माहिती उघड झाली आहे. एटीएम आणि पीओएस मशीनमध्ये स्किमिंग डिव्हाइसेस बसवून हा डेटा चोरीला गेला आहे. यात ट्रॅक -२ स्तरीय डेटा देखील आहे, जो कार्डच्या चुंबकीय स्तरामध्ये आहे. ट्रॅक -२ लेव्हल डेटामध्ये ग्राहकांच्या प्रोफाइल आणि व्यवहाराशी संबंधित महत्वाची माहिती असते.

या डेटा चोरीतून लक्षात येतंय की, सध्याच्या डिजिटल जगात डेटा सुरक्षित ठेवणं कठीण होत आहे. डेटा चोरीमागे आपलं बँक खातं साफ करणं हा गुन्हेगारांचा एकच हेतू आहे. म्हणून कार्डधारकाने सतर्क असणं आवश्यक आहे. आपण काही गोष्टींची काळजी घेऊन आपल्या बँक डेटाचे संरक्षण करू शकतो. डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकाने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती आपण घेऊया. 

  • बँक कार्ड धारकांनी त्यांचे क्रेडिट, डेबिट कार्डचे फोटो कधीही, कोठेही पोस्ट करू नयेत. 
  • कार्डधारकाने त्याच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे व्यवहार फक्त सुरक्षित आणि विश्वासार्ह वेबसाइटवरून करावे.
  •  कार्डधारकाने कार्डचा तपशील ऑनलाइन टाकताना ऑटोफिल डिसेबल ठेवावे. तसंच वेळोवेळी वेब ब्राउझरची कॅश मेमरी  डिलीट करावी.  
  •  कार्डधारकाने कधीही आपले कार्ड सेव्ह करुन वेबसाइटवर ठेवू नये.
  •  सार्वजनिक आणि मोफत वाय-फाय इंटरनेट वापरताना आपल्या बँक कार्डचा तपशील भरू नका.
  • काही बँका असुरक्षित कार्ड देखील जारी करतात. या कार्डने स्वाइप मशीनवर ओटीपी किंवा पिनशिवाय व्यवहार केले जातात. अशा वेळी कार्डधारकाने बँकेशी संपर्क साधावा आणि त्यांचे कार्ड बदलून घ्यावे
  •  ग्राहकांनी वेळोवेळी आपला ऑनलाइन वाॅलेटचा पासवर्ड आणि कार्डचा पिन क्रमांक बदलला पाहिजे.
  • ऑनलाइन शॉपिंगनंतर ग्राहकांनी लॉग आउट केले पाहिजे.
  • ग्राहकांनी नेहमीच आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉपमध्ये नवीनतम आणि सशुल्क अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरावे
  • फिशिंग ईमेल आणि बनावट फोन कॉलबद्दल ग्राहकांनी सतर्क असले पाहिजे. लक्षात ठेवा की कोणतीही बँक, वेबसाइट किंवा विमा कंपनी आपल्या क्रेडिट-डेबिट कार्ड किंवा सीव्हीव्हीचा तपशील विचारत नाही.
  • स्मार्टफोनमध्ये अॅप  डाऊनलोड करताना आवश्यकतेनुसार अॅक्सेस द्या. एसएमएस, कॉल आणि गॅलरीमध्ये प्रवेश मागणाऱ्या अ‍ॅप्सचा वापर करू नका. असे अॅप्स वापरणे आवश्यक असल्यास, त्यांना allow once  वर अॅक्सेस द्या आणि खाते व्हेरीफाय झाल्यानंतर अॅक्सेस रद्द करा.


गुन्हेगार सीव्हीव्ही सहज शोधतात

ग्राहकाने कोणत्याही बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा फोटो कधीही कोणत्याही वेबसाइट, मेल किंवा कोठेही अपलोड करू नये. सायबर गुन्हेगार आपले क्रेडिट कार्ड नंबर, कार्डची समाप्ती तारीख आणि सीव्हीव्ही नंबरद्वारे आपले खाते साफ करू शकतात. जरी सायबर गुन्हेगाराला आपल्या क्रेडिट कार्डच्या पुढील भागाचा फोटो मिळाला, तरीही ते आपल्या कार्डाचा सीव्हीव्ही नंबर शोधू शकतात. वास्तविक, सीव्हीव्ही क्रमांकाचा पहिला अंक म्हणजे आपल्या कार्ड क्रमांकाचा पहिला अंक असतो. आणि दुसरे दोन अंक हे कार्ड नंबरचे इतर कोणतेही दोन अंक असतात जे काही सॉफ्टवेअरच्या मदतीने गुन्हेगार शोधू शकतात.

असुरक्षित कार्डला नाही म्हणा

काही असुरक्षित डेबिट आणि क्रेडिट कार्डदेखील बँकेद्वारे जारी केले जातात. या कार्डने स्वाइप मशीनवर ओटीपीशिवाय व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत जर आपले कार्ड चोरीस गेले असेल तर गुन्हेगार ओटीपीशिवाय आपल्या खात्यातून व्यवहार करू शकतो. नुकसान टाळण्यासाठी ग्राहकाने अशी कार्डे बदलायला हवीत. 

खात्यातून पैसे काढल्यास काय करावे

जर आपल्या बँक खात्यातून अज्ञात व्यवहाराद्वारे पैसे काढले गेले असतील तर आपण त्वरीत बँकेशी संपर्क करायला हवा. तसंच ज्या वेबसाइटद्वारे पैसे गेले आहेत त्या  वेबसाइटशी संपर्क साधावा. जर आपण पैसे काढल्यानंतर ५ ते ६ तासांच्या आत बँक आणि वेबसाइटशी संपर्क साधला तर आपण ८० ते १०० टक्के पैसे परत मिळवू शकता.



हेही वाचा -

सुकन्या समृद्धी योजना : मुलींच्या सुरक्षित भविष्याची तरतूद

पीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा