Advertisement

PF खात्यातील शिल्लक रकमेची माहिती हवीय? 'हे' आहेत ४ मार्ग

ईपीएफओ (Employees Provident Fund Organisation - EPFO ) ने आपल्या सदस्यांना त्यांच्या PF खात्यातील जमा रकमेची माहिती मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.

PF खात्यातील शिल्लक रकमेची माहिती हवीय? 'हे' आहेत ४ मार्ग
SHARES

नोकरदारांच्या पगारातून दर महिन्याला पीएफ (Provident Fund -pf) कापला जातो. बऱ्याचदा अनेकांना आपल्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत हे माहीत नसतं. मात्र, याची माहिती तुम्हाला सहज मिळू शकते. ईपीएफओ (Employees Provident Fund Organisation - EPFO ) ने आपल्या सदस्यांना त्यांच्या खात्यातील जमा रकमेची माहिती मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. एसएमएस, ईपीएफओ वेबसाईट, मिस्ड कॉल, मोबाइल अॅप आदी पर्यायांद्वारे तुम्हाला पीएफमधील रक्कम किती आहे ते समजू शकते. यासाठी तुमचा UAN (Universal Account Number) नंबर ईपीएफओकडे रजिस्टर्ड करणं आवश्यक आहे. तुमच्या कंपनीने पीएफ खाते उघडल्यानंतर UAN नंबर मिळतो. हा नंबर तुमच्या पगाराच्या स्लिपवरदेखील असतो

वेबसाइटवरुन माहिती

ईपीएफओच्या वेबासाइटवर गेल्यावर our services वर क्लिक केल्यावर for employees हा पर्याय दिसेल. या पर्यायात सर्विस सेक्शन हा पर्याय दिसेल. यामध्ये मेंबर पासबुक या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक लाॅगिन पेज अोपन होईल. यामध्ये UAN नंबर आणि पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला ईपीएफ खात्याची सर्व माहिती दिसेल.


एसएमएसद्वारे

एक एसएमएस पाठवून तुम्ही सहजपणे पीएफ खात्याची माहिती मिळवू शकता. सुरूवातीला EPFOHO टाईप करा त्यानंतर स्पेस द्या मग तुमचा UAN नंबर लिहा. यानंतर पुन्हा एक स्पेस द्या आणि ज्या भाषेत तुम्हाला पीएफ खात्याची माहिती हवी आहे ती भाषा लिहा. तुम्हाला इंग्रजीत माहिती हवी आहे तर यूएएन नंबर टाईप केल्यावर स्पेस देऊन ENG टाईप करा. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी HIN टाईप करा. हा मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवल्यावर काही क्षणात पीएफ खात्यातील जमा रकमेची माहिती मिळेल.

मिस्ड कॉल करुन माहिती

मिस्ड कॉलच्या माध्यमातूनही ईपीएफची शिल्लक मिळते. यासाठी UAN नंबर ईपीएफओकडे नोंदवला असणं आवश्यक आहे. तसंच तुमची केवायसी सुद्धा केेलेली असणं गरजेचं आहे. रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 011-22901406 या क्रमांकावर कॉल केल्यास दोन रिंग झाल्यावर तुमचा फोन आपोआप कट होईल. त्यानंतर ईपीएफ खात्यातील शिल्लक एसएमएसने मिळेल.


मोबाइल अॅप

मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही पीएफ खात्याची माहिती मिळेल. भारत सरकारचं UMANG अॅप डाऊनलोड करून ईपीएफओ सेक्शनमध्ये माहिती भरून तुम्हाला पीएफची शिल्लक कळेल. याशिवाय ईपीएफओचे m-sewa अॅपही डाऊनलोड करून शिल्लक कळू शकते. m-sewa अॅपमध्ये पासबुक सेक्शनमध्ये तुमचा UAN क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबरची माहिती द्या. मग तुमची पीएफ खात्यातील रक्कम तुम्हाला दिसेल.हेही वाचा -

डेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card

COUPLES साठी पैशांचं व्यवस्थापन करणारी अॅप्स

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा