कोटक महिंद्रा बँकेची ‘एटीएम ऑन व्हील्स’ सुविधा

लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन कोटक महिंद्रा बँकेने एटीएम ऑन व्हील्स ही सुविधा सुरू केली आहे. कोटक बँकेच्या आणि इतर बँकांच्या ग्राहकांना या मोबाइल एटीएममधून आपल्या परिसरात पैसे काढता येणार आहेत.

 मुंबईत एटीएम ऑन व्हील्स ही प्रथमच सुविधा देण्यात आली आहे. आठवड्यातील सर्व दिवस मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. कोटकच्या एटीएम ऑन व्हील्स सुविधेमुळे मुंबईतल्या नागरिकांना त्यांच्या परिसरात पैसे काढण्याची सुविधा मिळेल, अशी माहिती कोटक महिंद्रा बँकेचे प्रेसिडेंट (प्रोडक्ट्स) पुनीत कपूर यांनी दिली. सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे, एटीएमच्या वापरापूर्वी सर्व ग्राहकांना सॅनिटायझर देणे, ठराविक अंतराने एटीएमचे निर्जंतुकीकरण, एटीएमच्या रांगेत उभे असलेल्या ग्राहकांनी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे आदींचं कठोर पालन केले जाणार आहे. कोटक एटीएम ऑन व्हील्सची दुसरी सुविधा पुढच्या आठवड्यात नवी दिल्लीत सुरू करणार आहे.

एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेनं मोबाइल एटीएम सुरू केलं आहे. यामध्ये आपण घराच्या बाहेर सामाजिक अंतर ठेवून किंवा काही पावलं चालत जाऊन एटीएममधून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. या एटीएम व्हॅन काही विशिष्ट भागात उभ्या केल्या जातील. मोबाईल एटीएममध्ये सर्वसाधारण एटीएमप्रमाणे रक्कम तपासणे, पिन चेंज, फंड ट्रांसफर या सर्व सुविधा मिळतील.


हेही वाचा -

पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ICICIची 'ही' नवी सुविधा

20 एप्रिलपासून फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल ऑनलाइन खरेदी करता येणार


पुढील बातमी
इतर बातम्या