Advertisement

20 एप्रिलपासून फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल ऑनलाइन खरेदी करता येणार

केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हार्डवेअर उत्पादन, जीवनाश्यक वस्तू आणि पॅकेजिंग यांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

20 एप्रिलपासून फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल ऑनलाइन खरेदी करता येणार
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. या कालावधीत संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, आता संसर्ग नसलेल्या भागात २० एप्रिलपासून बाजारपेठा सुरू होणार असल्याचं गुरुवारी गृह मंत्रालयाने सांगितलं आहे. त्यानुसार सोमवारपासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ई कॉमर्स कंपन्या मोबाइल तसंच फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, एसी, कुलर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार कपडे आणि शाळकरी मुलांसाठी स्टेशनरी विकू शकतील. स्थानिक बाजारपेठांत मात्र या वस्तूंची दुकाने उघडणार नाहीत.

केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हार्डवेअर उत्पादन, जीवनाश्यक वस्तू आणि पॅकेजिंग यांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योग, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्या यांचेही काम आवश्यकतेप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  ई-कॉमर्स कंपन्या आणि कुरिअर कंपन्यांना २० एप्रिलपासून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती.

लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यातील नव्या नियमावलीनुसार, मोबाइल फोन, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन सेटच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. २० एप्रिलपासून  ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि  अ‍ॅमेझॉन या कंपन्या आपले काम सुरु करुन या वस्तूंची विक्री करु शकतात.



हेही वाचा -

लॉकडाऊनमुळं पश्चिम रेल्वेला ४२७ कोटीचे नुकसान

Coronavirus Update : हिरो मोटोकॉर्पकडून ६० मोबाईल अँब्युलन्स




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा