Advertisement

लॉकडाऊनमुळं पश्चिम रेल्वेला ४२७ कोटीचे नुकसान

लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्यानं पश्चिम रेल्वे प्रशासन रेल्वेचे तिकीट रद्द करत आहे.

लॉकडाऊनमुळं पश्चिम रेल्वेला ४२७ कोटीचे नुकसान
SHARES

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त अनेक जण गावी जातात. गावी जाण्याकरीता रेल्वेचं बकींग २ ते ३ महिन्यांअगोदरच करतात. त्यानुसार यंदाही रेल्वे गाड्यांचं प्रवाशांनी बुकींग केलं होतं. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळं लांब पल्ल्यांच्या गाड्यांसह लोकलही ३ मेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्यानं पश्चिम रेल्वे प्रशासन रेल्वेचे तिकीट रद्द करत आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावरील लांब पल्यांच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. एक्सप्रेस सेवा उपलब्ध नसल्यानं प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचा परतावा पश्चिम रेल्वेकडून दिला जात आहे. 

१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण विभागातून एकूण ७ लाख १२ हजार प्रवाशांना ५३ कोटी ४७ लाख रुपयांचा तिकीट परतावा केला आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी पश्चिम रेल्वेच्या तिजोरीवर फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाच्या  प्रवासी वाहतुकीतून मिळणारे आणि इतर माध्यमातून मिळणारा महसूल सुद्धा बुडत आहे.

१ मार्च ते ३१ मार्च  कालावधीत २० लाख ९६ हजार प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे. परिणामी पश्चिम रेल्वेनं या प्रवाशांना १३२ कोटी २५ लाख रुपयांचा तिकीट परतावा दिला आहे. कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहेत. त्यामुळं रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी पश्चिम रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहेत. १ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत सुमारे ४२७ कोटीचे नुकसान पश्चिम रेल्वेला सोसावे लागले आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या किमान तापमानात वाढ

Zoom App वापरताय? सावधान, सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा