Advertisement

Zoom app वापरताय? सावधान, सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको

तुम्ही पण Zoom App वापरत असाल तर सरकारनं दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. यामागे काय कारण हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Zoom app वापरताय? सावधान, सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको
SHARES

कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus update) देशात लॉकडाउन (Lockdown) सुरू आहे. यावेळी लोक एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग (video Calling) अॅप झूमचा (Zoom app) वापरत आहेत. बर्‍याच ऑफिसमध्येही हे अ‍ॅप व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरले जात आहे. दरम्यान, सरकारनं हे अॅप सुरक्षित नसल्याचं जाहीर केलं आहे.

झूम अॅप मीटिंग कॉन्फरन्ससाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही. सरकारनं याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वैयक्तिक उद्देशांसाठी झूम अ‍ॅप वापरणार्‍या वापरकर्त्यांसाठी देखील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. लॉकडाऊन दरम्यान लोकं या अॅपचा अधिक वापर करत आहे. गृहमंत्रालयानं नवीन मार्गदर्शत तत्व लागू केली आहेत. त्यामध्ये झूम अॅप कोणत्याही व्यक्तीसाठी सुरक्षित व्यासपीठ नाही हे नमूद केलं आहे.

मार्गदर्शक तत्त्वाच्या मदतीनं, कॉन्फरन्समधील कोणत्याही अधिकृत नसलेल्या व्यक्तीचा हस्तक्षेप प्रतिबंधित केला जाईल. मार्गदर्शक तत्त्वाचं अनुसरण केल्यास वापरकर्त्यां व्यतिरिक्त कोणीही दुसरा व्यक्ती याचा चुकिचा वापर करू नाही शकणार. पासवर्ड आणि युझर एक्सेसच्या मदतीनं सायबर हल्ले रोखता येऊ शकतात.

गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बहुतेक सेटिंग्ज लॉगिनद्वारे किंवा आपल्या लॅपटॉप, फोनमध्ये अनुप्रयोग डाउनलोड करुन केली जाऊ शकतात. हे बदल कॉन्फरन्स दरम्यानही केले जाऊ शकतात. तथापि काही सेटिंग्ज केवळ एका विशिष्ट चॅनेलवर केल्या जाऊ शकतात.

गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, झूम अॅपवरून गोपनीयतेच्या मुद्द्यावरून बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. टिक टॉक आणि झूमचे अधिक सर्व्हर चीनमध्ये आहेत आणि त्यांच्यात काही कमकुवतपणा आहेत. तांत्रिक विश्लेषणामध्ये असं नमूद केलं आहे की, या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपमुळे मीटिंगमधील डेटा गहाळ होऊ शकतो.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, व्यापारी असो वा सरकारी अधिकारी कुणीही कृपया त्याचा वापर करू नका. भारताच्या सायबर सिक्युरिटी एजन्सीनं या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये यापूर्वीच्या वापरकर्त्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. व्हिडिओ कॉल कॉन्फरन्स दरम्यान पासवर्ड लिक झाल्याच्या तक्रारीनंतर हे मार्गदर्शक जाहीर करण्यात आलं आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा