Advertisement

coronavirus Update : हिरो मोटोकॉर्पकडून ६० मोबाईल अँब्युलन्स

अँब्युलंसमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, फर्स्ट एड किट, फायर एक्स्टींविशर, अग्निशामक यंत्र, सायरन अशा काही सुवधा देण्यात आल्या आहेत.

coronavirus Update : हिरो मोटोकॉर्पकडून ६० मोबाईल अँब्युलन्स
SHARES

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. संक्रमित रुग्णांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेऊन गरजूंना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी हिरो मोटो कॉर्पनं एक वेगळीच देणगी दिली आहे. त्यांनी कोरोना विरुध्दच्या लढाईत ६० मोबाईल अँब्युलन्स देणगी म्हणून दिल्या आहेत. उपचारात कोणतीही अडचण येऊ नये अथवा उशीर होऊ नये हा देखील या मागचा एक उद्देश आहे. आता देशातील विविध भागात त्या पोहोचवल्या जात आहेत. या अँब्युलन्स त्या त्या भागातील नागरिकांना सेवा देतील.


मोबाईल अँब्युलन्सची खासियत

मोबाईल अँब्युलन्सची खास बात म्हणजे ही चालवायला अगदी सोपी आहे. अरुंद गल्ल्या, कच्चे रस्ते यावरून व्यवस्थित प्रवास करू शकते. ही बाईक वेगळ्या प्रकारे कस्टमाइज केली गेली आहे. या अँब्युलन्सना साईड कारही आहे. त्यात रुग्णाला बसवून प्रथमोपचार करता येतात. अथवा रुग्णाला झोपवून नेता येते. 


काय आहेत सुविधा?

अँब्युलंसमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, फर्स्ट एड किट, फायर एक्स्टींविशर, अग्निशामक यंत्र, सायरन अशी काही उपकरणे जोडली गेली आहेत. या अँब्युलन्स बाईकचे इंजिन १९९.६ सीसीचे एअरकुल्ड तंत्रज्ञान वापरलेले आहे. या मोबाईल अँब्युलन्ससाठी हिरो एक्स्ट्रीम २०० आर बाईकचा वापर केला गेला असून ती बीएस ६ नॉर्मला अनुरूप आहे.


१०० कोटींची मदत

हीरो समुहानं भारतात सध्या सुरू असलेल्या COVID १९ च्या संकटावर मात करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. मदत म्हणून त्यांनी १०० कोटी रुपयांची मदत केली आहे. तर या रकमेतील ५० कोटी रुपये पीएम-केअर फंडात दिले आहेत. उर्वरीत ५० कोटी रुपये इतर काही मदत कार्यासाठी वापरले जात आहेत.


जेवणाचं वाटप

हरियाणा राज्यातील धारुहेरा इथं हीरो ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या बीएमएल मुंजाळ विद्यापीठानं २००० खाटांची व्यवस्था केली आहे. रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी किंवा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही जागा दिली आहे. तर हीरो मोटोकॉर्प दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि गुजरात अशा अनेक भागांत अडकलेल्या मजुरांना आणि बेघर कुटुंबांना रोज १५ हजाराहून हून अधिक मिलचं वाटप केलं जातं आहे.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा