Advertisement

पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ICICIची 'ही' नवी सुविधा

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आयसीआयसीआय बँकेनं एक खास सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे.

पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ICICIची 'ही' नवी सुविधा
SHARES

कोरोनाव्हायरसचा (coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत पैशाची गरज असल्यास लोकांना घराबाहेर पडण्याची गरज नाही. कारण एचडीएफसी बँक (HDFC Bank) नंतर आता आयसीआयसीआय बँकेनं (ICICI Bank)नं मोबाइल एटीएम (ATM) सुरू केलं आहे. ज्यानंतर आपण घराच्या बाहेर सामाजिक अंतर (Social Distancing) ठेवून किंवा काही पावलं चालत जाऊन एटीएममधून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही.


मोबाईल व्हॅनची सुविधा

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आयसीआयसीआय बँकेनं एक खास सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. या सुविधेंतर्गत तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आयसीआयसीआय बँक आता थेट मोबाईल एटीएम व्हॅनची सुविधा देत आहे. या एटीएम व्हॅन काही विशिष्ट भागात उभ्या केल्या जातील. मोबाईल एटीएममध्ये सर्वसाधारण एटीएमप्रमाणे रक्कम तपासणे, पिन चेंज, फंड ट्रांसफर या सर्व सुविधा मिळतील.


'या' वेळेत सुरू

बँक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे मोबाइल एटीएम एका विशिष्ट ठिकाणी ओळखले जाईल आणि एका वेळेतच वापरता येतील. बँकेनं दिलेल्या वेळेनुसा लोक एटीएममधून पैसे काढू शकतात. व्हॅन एटीएमची ही सुविधा सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत असेल. एटीएम व्हॅन लोकांच्या घरांच्या आसपासच ठरलेल्या वेळेत लावण्यात येतील. जेणेकरुन लोक आवश्यकतेनुसार एटीएममधून पैसे काढू शकतील, असं ICICI बँकेकडून सागंण्यात आलं आहे.


HDFCची पण व्हॅन

काही दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकेनं मोबाइल एटीएम व्हॅनची सुविधा जाहीर केली होती. त्यानंतर आता (ICICI Mobile Bank ATM)) आयसीआयसीआय बँकेनं मोबाइल एटीएम चालविण्याची घोषणा केली आहे. यासाठी आयसीआयसीआय बँकेनं (बँक) देशभर मोबाइल एटीएमची व्यवस्था केली आहे. हे मोबाईल एटीएम देखील एका विशिष्ट ठिकाणी, निश्चित कालावधीसाठी उभे केले जाईल. ज्याचा उपयोग ग्राहक करू शकतील.


कुठे असणार ATM?

हे एटीएम कुठे असतील, याचा निर्णय संबधित शहरातील महानगरपालिकेशी चर्चा करून घेतला जाईल. या सुविधेमुळे ग्राहक पैसे काढण्यासाठी लांब जाण्याची गरज भासणार नाही.

कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येकाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. लॉकडाऊन असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. बँका देखील आपल्या ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगत आहे. याशिवाय ग्राहकांना समस्या येऊ नये यासाठी वेगवेगळ्या सुविधा देखील देत आहेत.



हेही वाचा

कोरोनाशी लढण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकचा मदतीचा हात

पीएफमधून करमुक्त रक्कम काढता येणार, नियमांमध्ये बदल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा