Advertisement

कोरोनाशी लढण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकचा मदतीचा हात

आता कोरोनाशी लढण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) नं भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकचा मदतीचा हात
SHARES

कोरोनाव्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारनं १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. केद्र आणि राज्य सरकार व्हायरसशी लढा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. यासाठी सरकारला आर्थिक मदतीची आवश्यक्ता आहे. अनेक बॉलिवूड आणि व्यवसायकांनी सरकारला आर्थिक मदत केली आहे.

आता कोरोनाशी लढण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) नं भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे. एडीबीचे अध्यक्ष मासात्सुगु आसाकावा यांनी याबाबत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतामण यांच्याशी चर्चा केली. यावेळी असाकावा यानी एडीबीकडून भारताला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, भारताला २.२ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास १६ हजार ७०० कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची तयारी केली जात आहे.

कोरोना व्हायरसच्या लढाईत भारताकडून कऱण्यात येत असलेल्या उपाययोजनांचं एडीबीनं कौतुक केलं आहे. यामध्ये नॅशनल हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रॅमशिवाय उद्योग क्षेत्रात टॅक्समध्ये सूट देण्यावरही विचार केला जात आहे. तसंच तीन आठवड्यांच्या लॉक़डाऊनमुळे गरीबांना, महिलांना आणि कामगारांना धान्याच्या मदतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचाही समावेश आहे.

असाकावा म्हणाले की, एडीबी भारतला संकटकाळात असलेल्या गरजांच्या पुर्ततेसाठी सहाय्य करण्यास तयार आहे. आता आम्ही भारताला तात्काळ २.२ अब्ज डॉलरची मदत देण्याची तयारी करत आहे. ही रक्कम आरोग्य क्षेत्रासह कोरोनामुळे गरीबांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी वापरण्यात येईल. बँकेची ही मदत गरज पडल्यास वाढवण्यात येईल.



हेही वाचा

'हे' बँकर घेणार अवघे १ रुपया वेतन

स्टेट बँकेची बचत खात्यावरील व्याजदरात कपात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा