Advertisement

स्टेट बँकेची बचत खात्यावरील व्याजदरात कपात

भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यावरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे.

स्टेट बँकेची बचत खात्यावरील व्याजदरात कपात
SHARES

भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यावरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. बचत खात्यावरील व्याजदर बँकेने पाव टक्क्याने कमी केले आहेत. त्यामुळे एसबीआयकडून आता बचत खात्यावर २.७५ टक्के व्याज दिले जाणार आहे. नवा व्याजदर १५ एप्रिलपासून लागू होणार आहे.

बाजारात पुरेशा प्रमाणात खेळता पैसा राखण्यासाठी स्टेट बँकेने आपल्या बचत खात्यांवरील व्याजदरांची पुनर्रचना केली आहे.  स्टेट बँकेने दोनदा व्याजदर कमी केला आहे. याआधी बचत खात्यातील रकमेवर बँकेने ३ टक्के व्याज देणार असे जाहीर केले होते. मात्र आता ते २.७५ टक्के मिळेल. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात मोठी कपात केल्यानंतर स्टेट बँकेने कर्जे ०.७५ टक्के स्वस्त केली होती. त्यावेळी बचत खात्यावरील व्याजदर सरसकट ३ टक्के करण्यात आला होता. त्याचवेळी रिटेल व घाऊक ठेवींवरील व्याज ०.२० ते १ टक्का कमी केले होते.

स्टेट बँकेने एक्टर्नल बेंचमार्क आधारित कर्जांचा दर १ एप्रिलपासून ७.८० ट्कक्यांवरून कमी करून ७.०५ टक्क्यांवर आणला आहे. रेपो संलग्न कर्जदर ७.४० टक्क्यांवरून ६.६५ टक्क्यांवर आणला जाणार आहे. तसंच बँकेने मुदतठेवींच्या व्याजदरांमध्ये ०.२० ते १ टक्का कपात केली आहे. घाऊक टर्म ठेवींच्या व्याजदरांत ०.५० ते १ टक्का कपात करण्यात आली आहे. 



हेही वाचा -

कोरोनाविरोधत लढण्यासाठीच्या निधीसाठी भारत-पाक मालिका खेळवा- शोएब अख्तर

मुंबईतील भाटिया रुग्णालयही सील

बापरे! वरळीत आणखी ५५ कोरोनाग्रस्त सापडले




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा