Advertisement

मुंबईतील भाटिया रुग्णालयही सील

भाटिया रुग्णालयामध्ये आलेले ३ रुग्ण करोनाबाधित असल्याचं समोर आलं.

मुंबईतील भाटिया रुग्णालयही सील
SHARES

राज्यासह मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत अनेक रुग्ण आढळले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं नकळत कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानं अनेक डॉक्टर व नर्सना देखील कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी त्यांच्यामुळं इतर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील नामांकित वोक्हार्ट आणि जसलोक रुग्णालय सील करण्यात आलं. अशातच आता भाटिया रुग्णालय ही सील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबईतील नामांकित वोक्हार्ट आणि जसलोक रुग्णालयापाठोपाठ भाटिया रुग्णालयामध्ये आलेले ३ रुग्ण करोनाबाधित असल्याचं समोर आलं. त्यामुळं सरक्षेच्या दृष्टीनं रुग्णालयातील ७१ कर्मचाऱ्यांचं आतमध्येच विलगीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळं हे रुग्णालयही सील करण्यात आलं आहे. एका रुग्णाच्या संसर्गामुळं संपुर्ण रुग्णालय सील करण्याची वेळ आता या रुग्णालयांवर आली आहे.

जसलोक रुग्णालयातील २१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, ९८४ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये परिचारिकांचाही समावेश आहे. यातील १६ जणांना सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील ओपीडीसह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. वोक्हार्ट रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सच्या वैयक्तिक सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेण्यात न आल्यानं रुग्णालयातील १० जणांना करोनाची लागण झाल्याचा आरोप नर्सच्या नातेवाईकांनी केला होता. परंतु, यामध्ये तथ्य नाही असं या रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु, आता अखेर हे वोक्हार्ट रुग्णालयानं ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करून रुग्णालय बंद केलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा