Advertisement

बापरे! वरळीत आणखी ५५ कोरोनाग्रस्त सापडले

वरळीत कोरोनाचे ५५ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ६९६वर गेली आहे.

बापरे! वरळीत आणखी ५५  कोरोनाग्रस्त सापडले
SHARES

मुंबईतील करोना रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. यामध्ये कोरोनानं वरळीकरांना चांगलच घेरलं आहे. वरळीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. वरळीत कोरोनाचे ५५ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ६९६वर गेली असून, महापालिकेच्या जी/ दक्षिण विभागात रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली आहे.

वरळीत झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात असल्यानं कोरोनाचं थैमान रोखण्याची आरोग्य यंत्रणेसमोरील डोकेदुखी वाढली आहे. पोलीस आणि महापालिकेने या परिसरातील अनेक भाग सील केले आहेत. या ठिकाणी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. संबंधित परिसरात सॅनिटायझेशन करण्यात येत असून, औषधांची फवारणीही होत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारीही घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत.

मुंबई महापालिकेनं २४ वॉर्डांमध्ये क्वॉरंटाइनची व्यवस्था केली आहे. या सेंटरमध्ये सुमारे ११ हजार लोकांना ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय आणि लो रिस्क रुग्णांना या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने, राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या (NSCI) डोमला विलगीकरण केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमला क्वारंटाइन झोनमध्ये बदलण्याची तयारी सुरू देखील झाली आहे. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्वीट केले आहे.



हेही वाचा -

वरळीतील NSCI केंद्राचे भव्य विलगीकरण कक्षात रुपांतर

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा