Advertisement

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट

मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५००च्या वर पोहचला असून त्यात वरळी परिसरात सर्वाधिक ७८ रुग्ण सापडले आहेत.

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट
SHARES

मुंबईतील करोना रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. मुंबईची आकडेवारी पाहता यामध्ये कोरोनानं वरळीकरांना टार्गेट केल्याचं चित्र आहे. कारण, एकट्या वरळीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५००च्या वर पोहचला असून त्यात वरळी परिसरात सर्वाधिक ७८ रुग्ण सापडले आहेत.

करोनाचा संसर्ग विविध भागांत पसरत असल्यानं महापालिकेचा आरोग्य विभाग चिंतेत आहे. मुंबईतील वरळी परिसरासह कुलाबा व मशिद बंदर परिसरात ५ ते ६ रुग्ण आढळून आले आहेत. वरळी परिसरात एका बाजूला कॉर्पोरेट कार्यालयं, टोलेजंग इमारतींचा भाग तर दुसरीकडे झोपडपट्टयांचा भाग आहे. वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळी, बेस्ट वसाहत, पोलिस कॅम्प या दाटीवाटीच्या वसाहती आहेत. 

या भागात सर्वाधिक करोना रुग्ण आढळल्यानं बहुतांश परिसर सील करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भायखळ्यात ४८ रुग्ण सापडले आहेत. रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर भागात सुरुवातीला १९ रुग्ण सापडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका दिवसांत तब्बल २५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसंच, ग्रँट रोड, ताडदेव विभागात आतापर्यंत ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक कमी ए-कुलाबा आणि बी-मशिद बंदर विभागात अनुक्रमे ६ व ५ रुग्ण सापडल्याची नोंद आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

 • जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी ७८
 • डी - ग्रँट रोड, ताडदेव ४३
 • के पश्चिम - अंधेरी ४०
 • के पूर्व - अंधेरी २६
 • ई - भायखळा ४८
 • पी उत्तर - मालाड ३२
 • एच पूर्व - वांद्रे ३१
 • एम-पूर्व - मानखुर्द १८
 • एम पश्चिम - चेंबूर २०
 • एन - घाटकोपर १४
 • आर दक्षिण - कांदिवली १८
 • एस - भांडुप १४
 • टी - मुलुंड ७
 • सी - पायधुणी, भुलेश्वर ७
 • पी दक्षिण - गोरेगाव १३
 • एच पश्चिम - वांद्रे १६
 • ए - कुलाबा ६
 • एल- कुर्ला १४
 • एफ उत्तर - माटुंगा ९
 • आर उत्तर - दहिसर ७
 • आर मध्य - बोरिवली ८
 • जी उत्तर - दादर ९
 • एफ दक्षिण - परळ ७
 • बी - मशिद बंदर ५
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा