Advertisement

कोरोनाविरोधत लढण्यासाठीच्या निधीसाठी भारत-पाक मालिका खेळवा- शोएब अख्तर

करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

कोरोनाविरोधत लढण्यासाठीच्या निधीसाठी भारत-पाक मालिका खेळवा- शोएब अख्तर
SHARES

भारतासह जगभरात कोरोनाच्या व्हायरसनं जनतेला हैराण केलं आहे. या कोरोना व्हायरसमुळं नागरिकांना घराबाहेर पडता येत नसून, त्यांना मोठ्या त्रासांनाही सामोरं जावं लागतं आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी भारतातील सरकारी यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहे. अशातच भारताचा शेजारी पाकिस्तानात करोना विषाणूमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशा परिस्थितीत करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

प्रत्येक देशात नागरिक आपलं सामाजिक भान ओळखत गरजू व्यक्तींना मदत करत आहेत. अनेक उद्योगपती, खेळाडू, कलाकार करोनाविरुद्ध लढ्यासाठी मदतनिधीही उभारत आहेत. 'सध्याचा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी असा पर्याय सुचवतो आहे. या सामन्यांचा निकाल काय लागेल याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी गंभीरतेने पाहू नये. विराट कोहलीने शतक झळकावलं तर त्याचा आनंद पाकिस्तानातील लोकांना झाला पाहिजे, बाबर आझमने शतक झळकावल्यानंतर भारतामधील चाहते खुश झाले पाहिजेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच क्रिकेट मालिका खेळत असल्यामुळं या सामन्यांना टिव्हीवर चांगली प्रेक्षकसंख्या लाभेल. यामधून मिळणारा निधी हा दोन्ही देशांच्या सरकारने कोरोनाविरुद्ध लढ्यात वापरावा', असं शोएब अख्तरनं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता ही घरात बसून आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत ही मालिका खेळवली गेल्यास याला प्रतिसादही चांगला मिळेल. ही वेळ मालिका खेळवण्यासाठी योग्य नाही, पण परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर दुबई सारख्या त्रयस्थ ठिकाणी हे सामने खेळवले जाऊ शकतात. खेळाडूंच्या प्रवासासाठी वेगळी सोयही केली जाऊ शकते. यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्यास मदत होईल असंही शोएब अख्तरने नमूद केलं.



हेही वाचा -

मुंबईतील भाटिया रुग्णालयही सील

बापरे! वरळीत आणखी ५५ कोरोनाग्रस्त सापडले



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा