Advertisement

पीएफमधून करमुक्त रक्कम काढता येणार, नियमांमध्ये बदल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ईपीएफ खात्यातून रक्कम काढणे सुलभ व्हावे यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत.

पीएफमधून करमुक्त रक्कम काढता येणार, नियमांमध्ये बदल
SHARES

पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला नसला तरी आता कर्मचारी भविष्य निधी खात्यातून (ईपीएफ) रक्कम काढता येणार आहे. या रकमेवर कोणताही कर द्यावा लागणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ईपीएफ खात्यातून रक्कम काढणे सुलभ व्हावे यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत.

कोरोनामुळे देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे बंद आहेत. अनेकांचं आर्थिक गणित बिघङलेलं आहे. त्यामुळे ईपीएफओने पीएफमधून रक्कम काढण्याचे नियम सुलभ केले आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याची कंपनीमध्ये 5 वर्षांची सेवा पूर्ण झाली असेल आणि त्याने ईपीएफमधून रक्कम काढली तर त्याला प्राप्तिकर द्यावा लागत नाही. नोकरीत 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला नसेल, तर टीडीएस आणि प्राप्तिकर मिळून १० टक्के रक्कम कापली जाते. ५०,००० रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम असेल तर, फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५ एच जमा करून टीडीएसपासून मुक्तता मिळवता येते. आतापर्यंत रक्कम काढण्यासाठी १.३७ लाख अर्ज आले असल्याची माहिती  ईपीएफओने दिली आहे. त्याअंतर्गत २८० कोटी रुपये काढण्यास मान्यता देण्यात आली आहे. अर्ज ७२ तासांतच निकाली काढण्यात येत आहेत.

ईपीएफओने ८ कोटी ईपीएफ धारकांना दिलासा देऊन त्यांची जमा रक्कम काढून घेण्याचा पर्याय दिला आहे. ईपीएफओने त्यासाठी ईपीएफ योजना १९५२ मध्ये बदल केले आहेत. कर्मचारी आपल्या खात्यामध्ये जमा रकमेच्या ७५ टक्के रक्कम किंवा तीन महिन्यांच्या वेतनाइतकी रक्कम काढू शकतात. ही रक्कम पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही.


हेही वाचा -

जी दक्षिण विभागात २५० कोरोनाग्रस्त

मुंबईसहीत ८ जिल्हे रेड झोनमध्ये, पुढं काय होणार?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा