Advertisement

जी दक्षिण विभागात २५० कोरोनाग्रस्त

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

जी दक्षिण विभागात २५० कोरोनाग्रस्त
SHARES

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तब्बल ७ वॉर्डमध्ये प्रत्येकी ५० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ११ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार ‘जी दक्षिण’मध्ये 246 रुग्ण आहेत. जी दक्षिण आणि ई हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. या दोन्ही प्रभागांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. ‘ई’ वॉर्ड मध्ये १११ रुग्ण आढळले आहेत.

डी वॉर्ड तिसऱ्या क्रमांकावर असून, इथं ९४ रुग्ण आहेत. एम पूर्व वॉर्डमध्ये गेल्या ५ दिवसात विलक्षण वाढ झाली आहे. इथे तब्बल ७० कोरोनाग्रस्त आहेत. एच पूर्व या विभागामध्ये ६७, तर के पूर्व मध्ये ६१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एल वॉर्डमध्ये ५७ इतकी रुग्णसंख्या आहे.


प्रत्येक विभागातील रुग्ण

  • जी दक्षिण – 246
  • ई – 111
  • डी – 94
  • एम पूर्व – 70
  • एच पूर्व – 67
  • के पश्चिम – 61
  • एल – 57
  • जी उत्तर – 9
  • के पूर्व – 44
  • पी उत्तर – 43
  • एम पश्चिम – 40
  • एफ उत्तर – 39
  • एफ दक्षिण – 38
  • दक्षिण – 37
  • आर दक्षिण – 27
  • एच पश्चिम – 26
  • उत्तर – 25
  • पी दक्षिण – 24
  • आर मध्य – 21 
  • बी – 20
  • आर उत्तर – 13
  • ए – 12
  • मध्य – 10
  • टी – 09



हेही वाचा -

धारावीत आणखी ४ नवे रुग्ण, संख्या ४७ वर

दीड लाख कामगार, बेघरांना पोटभर जेवण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा