Advertisement

दीड लाख कामगार, बेघरांना पोटभर जेवण

महापालिकेच्या पुढाकारानं १ लाख ५७ हजार स्थलांतरित कामगार व बेघर व्यक्तींच्या रोजच्या २ वेळच्या जेवणासाठी ३ लाख १४ हजार अन्न पाकिटांचं मोफत वितरण केलं जातं आहे.

दीड लाख कामगार, बेघरांना पोटभर जेवण
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं अनेक स्थलांतरित कामगार घरी जाऊ शकले नाही. तर बाजारपेठ, हॉटेल बंद असल्यानं त्यांच्या रोजच्या जेवणाचीही सोय होणे कठीण झालं आहे. त्यामुळं मुंबई अडकलेल्या या कामगारांच्या व बेघरांच्या रोजच्या जेवणाची सोय मानवतेच्या दृष्टिकोनातून पालिकेद्वारे केली जातं आहे. 

महापालिकेच्या पुढाकारानं १ लाख ५७ हजार स्थलांतरित कामगार व बेघर व्यक्तींच्या रोजच्या २ वेळच्या जेवणासाठी ३ लाख १४ हजार अन्न पाकिटांचं मोफत वितरण केलं जातं आहे. त्यासाठी दररोज तब्बल ९ लाख चपात्या, ३१ हजार किलो‌ भाजी किंवा ९५ हजार किलो खिचडी वा पुलाव बनवावा लागतो आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात १४ हजार ५०० गरजू व्यक्तींना अन्नाची पाकिटे दिली जात होती. ही संख्या वाढून आता दररोज १ लाख ५७ हजार व्यक्तींच्या जेवणाची सोय केली जात आहे‌.


अन्नाच्या वितरणासाठी 'बेस्ट'च्या बस गाड्या वापरण्यात येत असून एकूण ३४ बसगाड्यांमधून हे अन्नदान करण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष वितरण करताना नगरसेवकांचं सहकार्य घेतलं जात आहे. सुमारे ४०० पेक्षा अधिक ठिकाणी हे वितरण होत आहे. प्रत्येक अन्न पाकिटामध्ये ३ चपात्या, १०० ग्रॅम भाजी देण्यात येते तर कधी या ऐवजी सुमारे ३५० ग्रॅम खिचडी किंवा पुलाव, अथवा राजमा चावल देण्यात येत आहे.

एखाद्या भागात जेवणाची व्यवस्था करायची असल्यास कोरोनासाठी केलेल्या 'हेल्पलाइन' वर माहिती देता येईल. त्यासाठी १८००-२२-१२-९२ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर व स्थलांतरित कामगारांबाबत आवश्यक ती माहिती दिल्यानंतर अन्न पाकिट वितरणासाठी संबंधितांचा तपशील लिहून घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे, असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

हिंदमाता पुलाखालील रुग्णांची महापौरांकडून वांद्र्यात व्यवस्था

कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार - उदय सामंत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा