Advertisement

कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार - उदय सामंत

यंदा महाविद्यालयीन परीक्षाही रद्द होणार अशा विचारात असलेल्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार - उदय सामंत
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला. तसंच, नववी व अकरावीच्याही परीक्षा रद्द करण्यात आल्यानं यंदा महाविद्यालयीन परीक्षाही रद्द होणार अशा विचारात असलेल्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

'कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं अद्याप घेतलेला नाही. यासाठी ४ कुलगुरुंची कमिटी केलेली आहे. या कमिटीतून जी शिफारस येईल त्यानंतर यासंबंधी निर्णय होणार आहे. अगदीच 'कोरोना'मुळं आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर भविष्यातील परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतु, कुठल्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत', असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात काल घोषणा केली. २१ मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र २३ मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. शिक्षण विभागानं पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा

हिंदमाता पुलाखालील रुग्णांची महापौरांकडून वांद्र्यात व्यवस्था



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा