Advertisement

मुंबईसहीत ८ जिल्हे रेड झोनमध्ये, पुढं काय होणार?

वाढलेल्या लाॅकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून इतर व्यवहार सुरळीत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वर्गवारी झोननुसार केली आहे.

मुंबईसहीत ८ जिल्हे रेड झोनमध्ये, पुढं काय होणार?
SHARES

वाढलेल्या लाॅकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून इतर व्यवहार सुरळीत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वर्गवारी झोननुसार केली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार रेड, आॅरेंज आणि ग्रीन असे ३ झोन करून त्यानुसार कोरोनाबाधितांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. 

कसे ठरवले झोन?

ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असतील, त्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये होईल. ज्या जिल्ह्यात १५ पेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण त्या जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये होईल. तर ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसेल, अशा जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये होईल. 

'अशी' आहे जिल्ह्यांची वर्गवारी

रेड झोन

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली

ऑरेंज झोन

कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा

ग्रीन झोन

नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी

निर्बंध उठणार?

जे जिल्हे रेड झोनमध्ये असतील, तेथील निर्बंध आवश्यकतेनुसार आणखी कठोर केले जातील. तर ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये येतील, अशा जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवून तेथील निर्बंध हटवून अंतर्गत व्यवहार सुरळीत केले जातील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा