एलपीजी गॅस सिलिंडर महागला

जागतिक बाजारात एलपीजीच्या किमती वाढल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. देशभरात सोमवारपासूनविनाअनुदानित गॅस सिलिंडर ११.५० रुपयांनी तर व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महागला आहे.

विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी आता मुंबईकरांना ५९०.५० रुपये मोजावे लागतील. याआधी हा गॅस ५७९ रुपयांना मिळत होता.  आता दिल्लीत  विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 581.50 रुपयांवरून वाढून 593 रुपये झाली आहे.  चेन्नईत गॅस सिलिंडर ३७ रुपयांनी महागला आहे. या शहरात विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ६०६.५० रुपये झाली आहे. कोलकात्यात विनाअनुदानित गॅस सिलिंडर ६१६ रुपयांना मिळेल. याआधी तो ५८४.५० रुपयांना मिळत होता.

व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ११० रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्लीतील व्यावसायिकांना ११३९.५० रुपये मोजून गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. मुंबईत १९ किलोचा गॅस सिलींडर १०८७.५० रुपयांना मिळणार आहे.

विनाअनुदानित सिलिंडरचे दर (रुपये)

शहर            नवीन दर       जुने दर

मुंबई             ५९०.५०        ५७९

नवी दिल्ली     ५९३           ५८१.५०

कोलकाता       ६१६           ५८४.५०

चेन्नई          ६०६.५०        ५६९.५०


पुढील बातमी
इतर बातम्या