24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू

कोरोना बाधित पोलिसांची संख्या 93 ने वाढली असून सध्या 1514 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू
SHARES
देशांत कोरोना संकटाने हाहाकार माजवला असून 24 तासात मुंबईतील आणखी दोन पोलिस या आजाराला बळी पडले आहेत. तर कोरोना बाधित पोलिसांची संख्या 93 ने वाढली असून सध्या 1514 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोना बाधित पोलिसांच्या संपर्कातील 7 हजार पोलिसांना सध्या क्वारनटाइन करण्यात आले आहे. या महामारीने आतापर्यंत पोलिस दलातील 27 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

 
राज्यात कोरोना बाधित पोलिसांमध्ये 191 पोलीस अधिका-यांसह 1323 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. गेल्या चौवीस तासांत राज्यात 93 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या एक हजार 323 पोलिसांवर राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 7 हजार  पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर दोन हजारांवर पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे ही अतिसौम्य आहेत. तर त्यातील आतापर्यंत 970 हून अधिक पोलीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत अंदाजे 1303 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 472 योद्ध्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे चार हजार 448 पोलिसांना विलगीकरण करण्यात आले आहे.
सध्या 165 पोलीस अधिकारी आणि एक हजार 51 पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील दोन हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना झाला आहे. तसेच संशयीत रुग्णाच्या संपर्कात आलेले सात हजार पोलिस विलगीकरणात आहेत. याशिवाय 55 वर्षावर्षीय पोलिसांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. तसेच 50 वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या 10 हजार होमगार्ड, 1200 केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आले आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा