Advertisement

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाची मोलाची कामगिरी


लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाची मोलाची कामगिरी
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं अनेक मजूरांवर आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं मजूरांनी आपल्या गावची वाट धरली आहे. गावी जणाऱ्या या मजुरांसाठी रेल्वे प्रशासनानं स्पेशन ट्रेनची व्यवस्था केली आहे. राज्यांत परतता यावं यासाठी रेल्वेनं २८ मेपर्यंत कमी वेळेत ३ हजार ७०० श्रमिक गाड्या सोडण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या गाड्यांमधून ५३ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.

श्रमिक गाड्या सोडण्याची प्रक्रिया वेगळी आणि नियोजित असते. विशेष रेल्वे शेवटच्या स्थानकातून सुटल्यानंतर राज्य सरकारनं पुन्हा त्याच मार्गावर गाड्यांची मागणी केल्यानंतरही श्रमिक गाड्या मागणीनुसार त्या राज्यासाठी पाठविल्या जातात. कमीत कमी वेळेत ही प्रक्रिया राबविली जाते. राज्य सरकार यातील केवळ १५ टक्केच खर्च उचलत असून ८५ टक्के खर्चाचा भार रेल्वे उचलते. रेल्वेनं २८ मे ३ हजार ७०० श्रमिक गाड्या चालवताना ५३ लाखाहून अधिक प्रवाशांना त्यांच्या राज्यांत सोडलं. यातील ८० टक्के रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी सोडण्यात आल्या.

हेही वाचा - रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी; पुन्हा गाडीत रुपांतर

श्रमिक गाड्यांची मागणी २० आणि २१ मेला अनेक राज्यांनी केली. त्यानंतर गाड्या उत्तर प्रदेश, इटारसी, जबलपूर, पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन मार्गावरून चालवण्यात आल्या. या मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता स्थानकावरून प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ गेला आणि काही गाड्यांना उशिर झाला. या प्रवासात आजारी प्रवाशांची काळजीही घेण्यात आली. ती घेताना काही वेळा गाड्यांही थांबवाव्या लागल्या, असं रेल्वेनं स्पष्ट केलं.

हेही वाचा - मध्य रेल्वेवर तिकिटांचा परतावा देण्यास सुरूवात

मजूर-कामगारांची खाण्यापिण्याची अडचण होऊ नये यासाठी ८४ लाखांहून अधिक भोजनाची पाकिटं आणि सव्वा कोटींहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचंही वाटप केल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली.हेही वाचा -

दिलासादायक: वरळी कोळीवाड्यातील 'इतके' टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त

सोमवारपासून लांब पल्ल्याच्या २०० रेल्वे फेऱ्यांना सुरुवातसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा