Advertisement

सोमवारपासून लांब पल्ल्याच्या २०० रेल्वे फेऱ्यांना सुरुवात

देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली.

सोमवारपासून लांब पल्ल्याच्या २०० रेल्वे फेऱ्यांना सुरुवात
SHARES

मुंबईतील विविध ठिकाणी अडकलेल्यांसाठी सोमवारपासून रेल्वे वाहतुकसेवा सुरू करण्यात आली आहे. १ जूनपासून लांब पल्ल्याच्या २०० रेल्वे फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. सोमवार हा या सेवेचा पहिलाच दिवस असून, या दिवशी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. या गाड्या पूर्णपणे आरक्षित आहेत. विनावातानुकूलित आणि वातानुकूलित डबे असून आसन प्रकारातील सामान्य डबेही प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

हेही वाचा - पश्चिम रेल्वेचं जगजीवन राम रुग्णालय घेतंय रुग्णांची विषेश काळजी

१ ते ३० जून दरम्यान २६ लाख प्रवाशांनी या गाड्यांचं आगाऊ आरक्षण केलं आहे. प्रवासासाठी ९० मिनिटं आधी पोहोचणं आवश्यक असून प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक केलं आहे. या गाड्यांचं आरक्षण आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम) संकेतस्थळासह स्थानकातील तिकीट खिडक्यांवरही उपलब्ध करण्यात आलं आहे. 

हेही वाचा - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न- महापालिका आयुक्त

या प्रवासाकरीता केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवाशांना मास्क घालणं बंधनकारक असून चादर, ब्लॅंकेट मिळणार नाहीत. तर प्रवाशांनाच जेवण आणि पाण्याच्या बाटलीची सोय करावी लागणार असल्याचंही याआधीच रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. प्रवासाआधी प्रवाशांची स्थानकात थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

हे आहेत नियम

  • तिकीट भाड्यामध्ये केटरिंग शूल्क नाही. प्रीपेड मील बुकिंग आणि  ई-बुकिंगवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • IRCTC कडून खाद्यपदार्थ आणि सीलबंद पाणी काही गाड्यांमध्येच देण्यात येईल ज्यामध्ये पँट्री कार जोडण्यात आली असेल. तिकीट बुक करताना प्रवाशांना यासंदर्भात सूचना देण्यात येईल.
  • सर्व प्रवाशांनी त्यांच्याबरोबर जेवण आणि पाणी आणावे.
  • फूड प्लाझा आणि रेफ्रिशमेंट रूम दिल्या जाऊ शकतात. ज्याठिकाणी खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळेल, बसून खाण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.
  • ट्रेनमध्ये पडदे किंवा चादर उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवाशांना स्वत:चे सामान आणावे.
  •  कोचमधील तापमान रेग्यूलेट करण्यात येईल.
  • प्रवाशांनी कमीत कमी सामान घेऊन प्रवास करावा.

हेही वाचा -

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी

मुंबईतील 'या' ५ स्थानकांसाठी टॅक्सीसेवा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा