Advertisement

1 जूनपासून सुटणाऱ्या स्पेशल रेल्वे गाड्यांसाठी 'हे' आहेत नियम

1 जूनपासून भारतीय रेल्वे 200 पॅसेंजर ट्रेन्स सुरू करणार आहे. आयआरटीसी वेबसाइट आणि त्यांच्या अधिकृत अॅपवर या गाड्यांसाठी 21 मेपासून तिकीट बुकिंग सुरू झालं आहे.

1 जूनपासून सुटणाऱ्या स्पेशल रेल्वे गाड्यांसाठी 'हे' आहेत नियम
SHARES

 1 जूनपासून भारतीय रेल्वे 200 पॅसेंजर ट्रेन्स सुरू करणार आहे. आयआरटीसी वेबसाइट आणि त्यांच्या अधिकृत अॅपवर या गाड्यांसाठी 21 मेपासून तिकीट बुकिंग सुरू झालं आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत आणि यामध्ये एसी व नॉन एसी असे दोन्ही क्लास असणार आहेत. जनरल कोचमध्ये बसण्याकरता देखील आरक्षण करणे आवश्यक असणार आहे. कोणताही अनारक्षित कोच या गाड्यांमध्ये असणार नाही. या गाड्यांबाबतचे नियम रेल्वेने जाहीर केले आहेत. 

 हे आहेत नियम

  • तिकीट भाड्यामध्ये केटरिंग शूल्क नाही. प्रीपेड मील बुकिंग आणि  ई-बुकिंगवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • IRCTC कडून खाद्यपदार्थ आणि सीलबंद पाणी काही गाड्यांमध्येच देण्यात येईल ज्यामध्ये पँट्री कार जोडण्यात आली असेल. तिकीट बुक करताना प्रवाशांना यासंदर्भात सूचना देण्यात येईल.
  • सर्व प्रवाशांनी त्यांच्याबरोबर जेवण आणि पाणी आणावे
  • फूड प्लाझा आणि रेफ्रिशमेंट रूम दिल्या जाऊ शकतात. ज्याठिकाणी खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळेल, बसून खाण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही
  • ट्रेनमध्ये पडदे किंवा चादर उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवाशांना स्वत:चे सामान आणावे.
  •  कोचमधील तापमान रेग्यूलेट करण्यात येईल
  • प्रवाशांनी कमीत कमी सामान घेऊन प्रवास करावा

हेही वाचा -

एमबीए सीईटीचा निकाल जाहिर

मुंबईला ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा